बेळकोणी -21 सप्टेंबर 2023 येथे ड्रोन च्या साह्याने सोयाबीन वर फवारणी...

बेळकोणी -21 सप्टेंबर 2023 येथे ड्रोन च्या साह्याने सोयाबीन वर फवारणी...


संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी शास्त्रज्ञ डॉ. प्रियंका खोले, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांनी शेती मधील आधुनिक तंत्रज्ञाना बद्दल मार्गदर्शन केले तसेच कृषि ड्रोन बद्दल सविस्तर महिती दिली व महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या योजना बद्दल व अनुदानाबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली. त्यानंतर ड्रोन द्वारे सोयाबीन पिकावर वर फावरणी चे  प्रातेक्षिक दाखवण्यात आले. तसेच  शेतकऱ्याना नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल आणि वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत पुणे येथून आलेले CS Innovations  ड्रोन कंपनी चे इंजिनिअर ने सोयाबिन वर Drone  ने  फवारणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व त्याचबरोबर सखोल अशी माहिती उपस्थीत शेतकऱ्यां देण्यात आली. उपस्थीत शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणी नंतर शास्त्रज्ञ आणि इंजिनियर यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून ड्रोन तंत्रज्ञानाबद्धल सविस्तर माहिती  घेतली. या उपक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे ड्रोन तंत्रज्ञानाबाबतचे सामाजिक गैरसमज दूर झाले आणि त्यांनी नवीन तंत्रज्ञानाबाबत आनंद व्यक्त केला तसेच ड्रोन फवारणीबाबत सकारात्मक दृष्टिकोनही व्यक्त केला. #तंत्रज्ञानाची #कृषि #ड्रोनचे #प्रात्यक्षिक #agriculture #drone #farming 





Post a Comment

0 Comments